लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘कर्मयोगी एक अखंड प्रवास’च्या चित्रफितीचे सादरीकरण

पनवेल : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त त्यांचा जीवन प्रवास कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजने वार्षिक स्नेहसंमेलनात गाण्यांच्या आणि नाटिकेच्या माध्यमातून ‘कर्मयोगी एक अखंड प्रवास’ या शिर्षकाखाली सादर केला होता. त्याचे पुनश्च सादरीकरण चित्रफितीच्या माध्यमातून करण्यात आले.
उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये गुरुवारी (दि. 5) झालेल्या या कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, व्हाईस चेअरमन भगीरथ शिंदे, सचिव विकास देशमुख, लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज कामोठेचे चेअरमन आमदार प्रशांत ठाकूर, नगरसेवक परेश ठाकूर, संस्थेचे सहसचिव डॉ. राजेंद्र मोरे, डॉ. शिवलिंग मेनकुदळे, बंडू पवार, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य डी.बी.पाटील, ज्योत्स्ना ठाकूर, जनरल बॉडी सदस्य वाय.टी. देशमुख, लाईफ मेंबर रवींद्र भोईर, नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य निकिता खारकर, माजी पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यकारी मंडळ सदस्य अ‍ॅड. राहुल घरत, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, धीरज ओवळेकर, धैर्यशील माने, प्राचार्य स्वप्नाली म्हात्रे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे बालपण, शैक्षणिक प्रवास, मित्रपरिवार, कारकीर्द असा प्रवास उलगडून दाखवला गेला. या कार्यक्रमातून एक कुटुंबवत्सल आणि सामाजिक बांधिलकी जपणारा लोकनेता सर्वांनाच नव्याने अनुभवता आला. यावेळी उपस्थित सर्वच मंत्रमुग्ध झाले.

Check Also

The member group is always indeed there to aid when needed

Partypoker are an extremely valued spouse for people. And greatest of all – the value …

Leave a Reply