उलवे नोड : रामप्रहर वृत्त
उलवे नोडमध्ये वॉरियर्स क्लब अंतर्गत शिवकालीन मर्दानी खेळांचे प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थींनी रविवारी (दि.8) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची सदिच्छा भेट घेतली.
प्रशिक्षक ओमकार रंधवे आणि ऋतुजा रंधवे यांच्या नेतृत्वाखालील वॉरियर्स क्लबच्या बाल प्रशिक्षणार्थींना लाठी-काठी, दांडपट्टा, तलवारबाजी, भाला चालविणे इत्यादी मराठी मातीतील पारंपरिक मर्दानी खेळांचे प्रशिक्षण दिले जाते. लोकनेते रामशेठ ठाकूर हे उलवे येथील हनुमान मंदिर परिसरात आले असता त्यांची प्रशिक्षणार्थींना वॉरियर्स क्लबचे अध्यक्ष सागर रंधवे, प्रशिक्षिका ऋतुजा रंधवे यांच्यासह सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले.
यावेळी गव्हाण ग्रामपंचायतीच्या माजी सदस्य अॅड.योगिता भगत, सुधीर ठाकूर, किशोर पाटील, सुहास भगत, मंदिर कमिटीचे विकास सिंह, मनोजकुमार मौर्य, अॅड.सुनील मौर्य, गौतम कुमार, राजीव रंजन, मनोज चौधरी, राजकुमार सिंग, संजीव ठाकूर आदी उपस्थित होते.
Check Also
पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …
RamPrahar – The Panvel Daily Paper