Breaking News

मोहोपाड्यात शासकीय दाखले वाटप शिबिर

आमदार महेश बालदी यांच्या हस्ते वितरण

मोहोपाडा, चौक ः प्रतिनिधी
भाजप वासांबे जिल्हा परिषद विभागाच्या वतीने मोहपाडा येथे शासकीय दाखले वाटप शिबिर आयोजित करण्यात आले होते. अनेक लाभार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला. त्यांना आमदार महेश बालदी यांच्या हस्ते दाखल्यांचे वितरण करण्यात आले.
मोहपाडा साई मंदिर येथील सभागृहात झालेल्या या शिबिरास भाजपचे खालापूर तालुकाध्यक्ष प्रवीण मोरे, माजी जि.प. सदस्य मोतीराम ठोंबरे, कृष्णाशेठ पारंगे, विनोदशेठ भोईर, सरपंच उमा मुंढे, सरपंच प्रतिप पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, तहसीलदार अभय चव्हाण साहेब, नायब तहसीलदार सुधाकर राठोड, गटविकास अधिकारी संदीप कराड, पोलीस निरीक्षक संजय बांगर, मंडळ अधिकारी श्रीनिवास खेडकर तसेच प्रवीण काळबागे, प्रवीण जांभळे, सचिन तांडेल, भूषण पारंगे, श्याम म्हसकर, आकाश जुईकर, चेतन जाधव, राकेश खारकर, स्वप्नील राऊत, जयदत्त भोईर, दीपक कांबळे, स्वप्नील जोशी, बाळाराम जांभळे, प्रमोद जांभळे, अनिल कुरंगळे, सागर सुखदरे, विशाल मुंढे, अमित शहा, मनोज सोमानी, रूपेश प्रबळकर, संदीप म्हात्रे, उमाकांत भोईर, ज्ञानेश्वर जांभळे, संतोष पटेल, स्वप्नील मांडे यांच्यासह नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते.
या शिबिरात 300हून अधिक विद्यार्थी व नागरिकांना ज्येष्ठ नागरिक दाखला, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, डोमेसाईल दाखला, रेशन कार्ड काढणे, नाव वाढवणे व कमी करणे, आधार कार्ड, अपडेट व नवीन काढणे अशी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. सूत्रसंचालन संतोष चौधरी यांनी केले.

Check Also

भाजपकडून महिला सक्षमीकरणासाठी बळ दिले जाते -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष नेहमीच महिलांना शक्ती देण्याचे आणि त्यांना सक्षम करण्याचे काम …

Leave a Reply