पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल पंचायत समितीच्या निवडणुकीत अनेक वर्षांची मेहनत आणि कार्यकर्त्यांच्या पुण्याईमुळेच यश मिळाले. भाजपमध्ये काम करणार्याला नक्कीच संधी मिळते, अशी भावना भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांनी नवनिर्वाचित सभापती रंजना वास्कर आणि उपसभापती भूपेंद्र पाटील यांच्या जाहीर सत्कार समारंभावेळी व्यक्त केली.
पनवेल पंचायत समितीच्या निवडणुकीत यंदा पहिल्यांदाच भाजपने शेकापला हद्दपार करून आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. एकूण 16पैकी 15 जागांवर विजय मिळवत भाजपने पंचायत समितीवर आपला झेंडा फडकवला. या विजयानंतर करंजाडे गणाच्या रंजना वास्कर यांची सभापतीपदी, तर आदई गणाचे भूपेंद्र पाटील यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली. या ऐतिहासिक विजयाचे औचित्य साधून शुक्रवारी (दि. 13) पनवेल तालुक्यातील शेलघर येथे भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
जोपर्यंत अंगात ताकद आहे, तोपर्यंत जनतेची सेवा अविरतपणे सुरूच राहील, असे भाजप नेते अरुणशेठ भगत म्हणाले. कार्यक्रमापूर्वी शेलघर गावामध्ये ढोल-ताशाच्या गजरात विजयी रॅली काढण्यात आली होती. यावेळी कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.
Check Also
पनवेलच्या झोपडपट्टी पुनर्वसनासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचा पाठपुरावा
मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा आणि त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न …
RamPrahar – The Panvel Daily Paper