Breaking News

नवीन पनवेल येथे भीम जयंती महोत्सव; गायक आनंद शिंदे यांचा बहारदार कार्यक्रम

आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंतीचे औचित्य साधून नवीन पनवेल येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या वतीने आयोजित सहा दिवसीय भीम जयंती महोत्सवाने सध्या संपूर्ण परिसरात चैतन्याचे वातावरण निर्माण केले आहे. या भव्य महोत्सवात मंगळवारी (दि.१५) सायंकाळी सुप्रसिद्ध लोकगायक आनंद शिंदे यांचा भीमगीतांच्या बहारदार गायनाचा कार्यक्रम पार पडला. त्यांच्या पहाडी आवाजातील गाण्यांनी उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झालेे.
या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर यांनी सदिच्छा भेट देऊन महामानवाच्या स्मृतीस अभिवादन केले आणि आनंद शिंदे यांच्या गायनाचा आस्वाद घेतला. पनवेल महापालिकेचे सभागृह नेते प्रकाश बिनेदार यांनी या महोत्सवाचे नेटके नियोजन केले होते. आमदार प्रशांत ठाकूर यांनी या उपक्रमाचे कौतुक करत सर्वांना डॉ. आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्यासमवेत भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष जिल्हा अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे, पनवेलचे महापौर नितीन पाटील, उपमहापौर प्रमिला पाटील, माजी महापौर तथा विद्यमान नगरसेविका डॉ. कविता चौतमोल, माजी सभागृहनेते तथा विद्यमान नगरसेवक परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, जिल्हा चिटणीस रविनाथ पाटील, सभागृहनेते तथा कार्यक्रमाचे आयोजक ॲड. प्रकाश बिनेदार, नगरसेवक मनोज भुजबळ, गणेश कडू, अजय बहिरा, समीर ठाकूर, शशिकांत शेळके, सुमित झुंजारराव, दशरथ म्हात्रे, नगरसेविका राजेश्री वावेकर, प्रीती जॉर्ज, रूचिता लोंढे, शिवानी घरत, अस्मिता घरत, माजी नगरसेवक अनिल भगत, गणेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्राची जाधव, माजी सदस्य अमित जाधव, विचुंबे सरपंच प्रमोद भिंगारकर, वर्षा नाईक, दमयंती भोईर, कामगार नेते रवी नाईक, अरुण सोळंकी, अविनाश गायकवाड, राजू गायकवाड, अनिल जाधव, मयुरेश खिस्मतराव, स्वाती बिनेदार, यश बिनेदार यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते, भीम अनुयायी आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

पनवेलमध्ये घुमला ‌‘कृष्ण वेणुनाद‌’

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवी वर्षपूर्तीचे औचित्य पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवी …

Leave a Reply