पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पनवेल शहरात विविध समाजोपयोगी आणि सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. या उपक्रमांतर्गत भाजपचे पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या माध्यमातून कोळेश्वर विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांसाठी रेनकोट आणि शिक्षकांसाठी छत्री वाटप कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी (दि.७) करण्यात आले होते.
यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित राहून सर्व विद्यार्थ्यांना रेनकोट आणि शिक्षकांना छत्र्यांचे वाटप केले. वाढदिवसाचा खर्च टाळून विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या उपयोगास पडतील असे सामाजिक उपक्रम राबवल्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनी शहर उपाध्यक्ष केदार भगत यांचे मनापासून कौतुक केले व आभार मानले.
या कार्यक्रमाला भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, शहर सरचिटणीस अमित ओझे, रूपेश नागवेकर, प्रभाग १९चे अध्यक्ष पवन सोनी, युवा नेते प्रतिक बहिरा, मुख्याध्यापक दशरथ म्हात्रे, हरिश्चंद्र भगत, रामा भगत, युवा मोर्चा सरचिटणीस अनिमेश ओझे यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Check Also
सर्वात मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल जाहीर
राज्य पातळीवर ‘दीपावली’, तर रायगड जिल्हास्तरावर ‘इंद्रधनू’ प्रथमयंदापासून डिजिटल अंकालाही बक्षीस मुंबई ः रामप्रहर वृत्तसामाजिक, …
RamPrahar – The Panvel Daily Paper