उलवे नोड ः रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या उलवे नोडमधील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये रविवारी (दि. १६) द्वितीय पदग्रहण समारंभ (इन्व्हेस्टिचर सेरेमनी) उत्साहपूर्ण वातावरणात झाला. विद्यार्थ्यांसाठी हा समारंभ त्यांच्या नेतृत्वगुणांना व जबाबदारीच्या भावनेला चालना देणारा ठरला.
संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, संस्थेचे व्हॉईस चेअरमन वाय.टी. देशमुख, कार्यकारी मंडळाचे सदस्य तथा पनवेल महापालिकेचे नगरसेवक परेश ठाकूर, पंचायत समिती सदस्य वितेश म्हात्रे, साई संस्थान, उलवेचे अध्यक्ष रविशेठ पाटील, गव्हाण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विजय घरत, रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे चेअरमन भार्गव ठाकूर, वर्षा ठाकूर, संस्थेचे सदस्य ॲड. राहुल घरत, अमोघ ठाकूर, आदेश ठाकूर, सचिव डॉ. एस.टी. गडदे, योगिता भगत, दिपाली ठाकूर, किशोर पाटील, सुधीर ठाकूर, स्वप्नील ठाकूर, साईचरण म्हात्रे, श्री. भगत, वसंत पाटील, कांता घरत, प्राचार्य राज अलोनी, समन्वयक रुहल दुबे यांच्यासह इतर मान्यवर
उपस्थित होते.
यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
दरम्यान, या समारंभात ‘लोकनेता : एक युगपुरुष’ या विषयावर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. यामध्ये लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या जीवनप्रवासावर आधारित बालपण, शैक्षणिक प्रवास, कुटुंब, आध्यात्मिक जीवन व साहित्य-कला या विविध विषयांवरील सादरीकरणाने कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
Check Also
पनवेल महापालिका एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीची सभा
आमदार प्रशांत ठाकूर यांनी घेतला आरोग्य सेवांचा आढावा पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य …
RamPrahar – The Panvel Daily Paper