पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल शहरातील सोसायटी मित्र मंडळाच्या वतीने येथील एमसीसीएच मैदानात आयोजित करण्यात आलेल्या भव्य झंकार नवरात्रोसवाची अत्यंत उत्साहात सुरुवात झाली आहे. यंदाचे हे उत्सवाचे २१वे वर्ष असून तरुणाईसह नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे.
नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आणि पूजा भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष तथा नगरसेवक सुमित झुंजारराव आणि त्यांच्या पत्नी पल्लवी झुंजारराव यांच्या हस्ते भक्तिमय वातावरणात झाली. यावेळी भाजपचे प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर, महापालिकेचे माजी सभागृहनेते तथा नगरसेवक परेश ठाकूर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी आदिशक्ती जगदंबेचे दर्शन घेऊन पनवेलकरांच्या सुख, समृद्धी आणि आरोग्यासाठी प्रार्थना केली.
दरम्यान, झंकार नवरात्रोत्सवाचा पहिला दिवस जल्लोषात साजरा करण्यात आला. पहिल्याच दिवशी पनवेलकरांचा तुफान प्रतिसाद लाभल्याने संपूर्ण परिसर गरबा आणि दांडियाच्या ठेक्याने दुमदुमून गेला होता. नगरसेवक परेश ठाकूर यांनी येथे सदिच्छा भेट देऊन उपस्थितांशी संवाद साधला व उपस्थितांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनीदेखील गरब्याचा आनंद लुटत उपस्थितांचा उत्साह वाढवला. त्यांच्यासमवेत नगरसेवक सुमित झुंजारराव तसेच उल्हास झुंझारराव, संजय जैन यांच्यासह अन्य मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते. दांडियांमध्ये उत्कृष्ट नृत्य करणाऱ्या विजेत्या खेळाडूंना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
Check Also
पाली येथे भाजपची सेवा ज्योती यात्रा
पाली ः प्रतिनिधीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक सेवेतील ऐतिहासिक प्रवासाला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने …
RamPrahar – The Panvel Daily Paper