पनवेल: प्रतिनिधी
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त महास्वच्छता अभियानाचे आयोजन पनवेल महापलिका क्षेत्रामध्ये करण्यात आल आहे. त्याअंतर्गत अभियानाच्या दुसर्या दिवशी खारघर येथे या स्वच्छता अभियानाचे उत्सफुर्दपणे राबविण्यात आले. याचा शुभारंभ माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आल. या वेळी उपस्थित मान्यरांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व पनवेल भारतीय जनता पार्टी आणि पनवेल महापालिका यांच्यावतीने 1 ते 10 जूनदरम्यान पनवेल महापालिका हद्दीत महास्वच्छता अभियानाचं राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा शुभारंभ शनिवारी पनवेल येथे झाला असून, रविवारी खारघर येथील प्रभाग क्रमांक 4, 5, 6 मध्ये महास्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या स्वच्छता अभियाना वेळी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हा प्रवक्ते वाय.टी. देशमुख, सभागृहनेते परेश ठाकूर, तालुकाध्यक्ष अरूणशेठ भगत,स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे, महिला व बालकल्याण सभापती लीना गरड, शिवसेना जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील, प्रभाग समिती अ अध्यक्ष शत्रुघ्न काकडे, नगरसेबक अभिमन्यू पाटील, नितीन पाटील, निलेश बावीस्कर, नरेश ठाकूर, प्रवीण पाटील, भाजपनेते वासुदेव पाटील, प्रभाकर जोशी, नगरसेविका हर्षदा उपाध्याय, अनिता पाटील, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, भाजप महिला मोर्च्याच्या मोना अडवाणी, बीना गोगरी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या वेळी माजी खासदार लोकनेेते रामशेठ ठाकूर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं.