पनवेल : रामप्रहर वृत्त
सर्वधर्मसमभाव जपत आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघातर्फे विविध कार्यक्रम वर्षभर साजरे केले जातात. गणेशोत्सवादरम्यान भाविकांना सरबत वाटप, गुरुनानक जयंतीनिमित्त आश्रमात अन्नधान्य वाटप व इतर अनेक सामाजिक उपक्रम संघटनेतर्फे वर्षभर राबवले जातात.या वर्षी ईदनिमित्त 100 गरीब गरजू लोकांना शिरखुरमाचे साहित्य (काजू, बदाम, पिस्ता, मनुके, शेवयी) काल संघटनेच्या कार्यालयात वाटप करण्यात आले. पैशाअभावी अनेक कुटुंब ईद साजरी करू शकत नाहीत. त्यासाठी संघटनेतर्फे हा छोटासा प्रयत्न केला जात असून पुढच्या वर्षी जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत पोहचून मदत करणार असल्याचे डॉ. मुनीर तांबोळी यांनी सांगितले. गरीब व गरजू लोकांना ईदचे साहित्य वाटप करताना आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा ऑल इंडिया तांबोळी जमात फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. मुनीर तांबोळी, ब्रँड आंबेसिडर ज्येष्ठ अभिनेते प्रकाश राणे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष अल्ताफ सैय्यद, कोकण अध्यक्ष भारत भोपी, कोकण कार्याध्यक्ष समीर तांबोळी, महिला महाराष्ट्र सचिव ओड्राई डिकोस्टा, फिरोज सैय्यद, सामाजिक कार्यकर्ते हनिफ कच्छी, इम्रान खान, सलमान शेख, इम्रान शेख, झाकीर कक्कर व इतर सदस्य उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper