Breaking News

फित न कापता वृक्षारोपणाने कार्यालयाचे उद्घाटन

पनवेल : प्रतिनिधी

राज्यात सध्या सगळ्यांना दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागताहेत. पाण्यासाठी ग्रामीण भागात तर लोकांना अक्षरशः वणवण करावी लागतेय. त्यामुळे ही सगळी परिस्थिती पाहता वृक्ष लागवड किती महत्त्वाची आहे हा संदेश देण्यासाठी कामोठे येथे परेश गायकवाड, अक्षय निजामपूरकर, सोमनाथ पाटील या तीन तरुण वकिलांनी स्वतःच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन फित न कापता या कार्यालयासमोर एक वृक्ष लावून केली.शिवाय व्यवसायातून येणार्‍या उत्पन्नातील काही खर्च विविध ठिकाणी वृक्ष लागवड आणि त्याची जोपासना करण्यासाठी करण्याचा निर्धार या तरुण वकिलांनी केला आहे. वकिलांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.पर्यावरणाचा संदेश देत कार्यालयाचे उद्घाटन या अनोख्या उद्घाटन समारंभात शुभेच्छा देण्यासाठी भाजप नगरसेवक एकनाथ गायकवाड, समाजसेवक शांताराम महाडिक, पनवेल बार असोसिएशन सदस्य धनराज तोकडे, उद्योजक जितेंद्र माने, अविनाश गायकवाड, विवेक आढाव, संतोष लोटणकर, तसेच भाजप युवा नेते सचिन गायकवाड उपस्थित होते.

Check Also

नवीन पनवेलमधील आगग्रस्त कुटुंबांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आर्थिक मदत

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून घटनास्थळी पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्तनवीन पनवेल सेक्टर 1/एस …

Leave a Reply