Breaking News

शेकाप, राष्ट्रवादी, काँग्रेसला खिंडार

माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, सुनील घरत यांच्यासह अजय कांडपिळे, जयवंत महामुनी समर्थकांसह भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त

शेतकरी कामगार पक्षाचे माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, राष्ट्रवादीचे नेते व माजी नगराध्यक्ष सुनील घरत, पनवेल अर्बन बँकेचे चेअरमन व शेकापचे माजी नगरसेवक अजय कांडपिळे, राष्ट्रवादीचे माजी उपनगराध्यक्ष जयवंत महामुनी, काँग्रेसचे माजी नगरसेवक अशोक शेळके, राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका नीलम घरत, तसेच राष्ट्रवादीचे नगरसेवक विजय खानावकर यांचे बंधू दिलीप खानावकर, शेकापच्या नगरसेविका राणी कोठारी यांचे पती कमल कोठारी, राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष भीमसेन माळी, खारघरचे माजी उपसरपंच संजय घरत, भगवान गायकर यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी रविवारी (दि. 29) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. या दिग्गज कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे आमदार प्रशांत ठाकूर यांची ताकद आणखी वाढली आहे.

नवीन पनवेल आणि कळंबोली येथे झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, पनवेल शहराध्यक्ष जयंत पगडे, सभागृह नेते परेश ठाकूर,

ज्येष्ठ नेते अतुल पाटील, जिल्हा उपाध्यक्ष वासुदेव घरत, नगरसेवक मनोहर म्हात्रे, अनिल भगत, मनोज भुजबळ, एकनाथ गायकवाड, अमर पाटील, तेजस कांडपिळे, राजेंद्र शर्मा, नगरसेविका चारुशीला घरत, सुशीला घरत, राजश्री वावेकर, वृषाली वाघमारे, प्रमिला पाटील, अल्पसंख्याक विभागाचे तालुकाध्यक्ष मन्सूर पटेल यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भाजप अधिक बलवान होईल : रामशेठ ठाकूर

भारतीय जनता पक्षामध्ये आज दिग्गजांनी मनापासून प्रवेश केल्याने पक्ष अधिक बलवान होणार आहे. यामुळे आमदार प्रशांत ठाकूर यांची ताकद आणखी वाढली असून, एक लाख मताधिक्याचे उद्दिष्ट अवघड नाही. तुम्ही पक्षाचे आधारस्तंभ बनाल आणि पक्ष तुम्हाला तुम्हाला मानाचे स्थान देईल, असे प्रतिपादन या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सर्वांचे भाजपमध्ये स्वागत करताना केले.

सगळे मिळून जनसेवा करू या  -आमदार प्रशांत ठाकूर

सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, आपण खुल्या मनाने भाजपमध्ये प्रवेश करीत असल्याबद्दल सर्वांचे स्वागत. तुम्ही माझ्यावर दाखवलेला विश्वास मी व्यर्थ जाऊ देणार नाही. आपल्या राजकीय आणि निवडणूक कामाच्या अनुभवाचा फायदा लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी निश्चित होईल. त्याकरिता सगळे मिळून प्रयत्न करू या.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply