Breaking News

दमदार पावसाने रोह्यात कामांची लगबग

रोहे ः प्रतिनिधी

 शहरासह ग्रामीण भागात पावसाने चांगली सुरूवात केली असून, वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. पहिल्या पावसाचा  आनंद लुटत असतानाच सर्वांचीच पावसाळ्यापुर्वीची कामे उरकण्याची लगबग सुरु झाली आहे.

रोह्यासह तालुक्यातील मेढा, यशवंतखार, सानेगाव, घोसाळे, चणेरा आदी भागांत पावसाने दमदार सुरुवात केली. हवेतील गारव्याबरोबरच गेली दोन दिवस रोहा तालुक्यात ढगाळ वातावरण आहे. बुधवारी दिवसभर हजेरी लावल्यानंतर रोह्यात रात्रीही पाऊस पडला. गुरुवारी सकाळी काही काळ सूर्यनारायणाचे दर्शन झाल्यानंतर रोह्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. त्यामुळे नागरिकांनी छत्रीसह रेनकोट बाहेर काढले होते.

Check Also

रक्तसाठा अद्ययावत माहितीच्या मुद्द्यावर आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी वेधले शासनाचे लक्ष

रक्तसाठ्याची माहिती वेळेवर अद्ययावत न करणाऱ्या रक्तकेंद्रांवर दंडात्मक कारवाई -आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर मुंबई : रामप्रहर …

Leave a Reply