Breaking News

मुलगा नालायक; पण नातू हुशार

बांगलादेशच्या विजयामुळे पाकला टोमणे

मुंबई : प्रतिनिधी

‘जाएन्ट किलर’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या बांगलादेशनं आयसीसी वर्ल्डकपमध्ये धडकी मारत टुर्नामेंटला आणखीनच रोमांचकारी बनवलंय. सोमवारी झालेल्या वेस्ट इंडिज विरुद्ध बांगलादेश मॅचदरम्यान वेस्ट इंडिजला सात विकेटनं पराभव स्वीकारावा लागला. बांगलादेशच्या या दमदार विजयाची प्रशंसा क्रिकेटवेड्या भारतात न झाली तरच नवल… सोशल मीडियावर बांग्लादेशच्या या विजयाचं उदाहरण देत काही क्रिकेट चाहत्यांनी पाकिस्तानवर निशाणा साधला. तर काहींनी ‘मुलगा नालायक, पण नातू मात्र हुशार’ असं म्हणत पाकिस्तानला टोमणे मारले.

भारतानं रविवारी पाकिस्तानला 89 रन्सनं पछाडलं होतं. योगायोगानं भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगला तो ‘फादर्स डे’च्या दिवशी… या योगायोगाचा क्रिकेट चाहत्यांनी संगम न साधला तर तो फॅन कसला… भारत आणि पाकिस्तान मॅचसाठीही अनेक ‘बाप-बेटे’ उल्लेख असलेल्या जाहिरातीही टीव्ही स्क्रीनवर धडाधड आदळत होत्या. मग त्याचं उधाण आपसूकच सोशल मीडियावरही दिसून आलं. सोमवारी बांगलादेशनं वेस्ट इंडिजला पछाडल्यानंतर भारत-पाकिस्तानच्या जाहिरात कॅम्पेननं आणखी एक पाऊल पुढे टाकलं.

‘बांगलादेशची टीम श्रीलंका आणि पाकिस्तानपेक्षा चांगली आहे. आशियात भारतानंतर बांग्लादेशच टॉपची टीम आहे,’ असं एका यूझरनं म्हटलं, तर एका चाहत्यानं म्हटलं, ‘हॅटस ऑफ बांग्लादेश क्रिकेट टीम… कमीत कमी स्रोतांसह इतका चांगला आऊटपूट कुणीही देऊ शकत नाही. खरंच ते आपल्या देशासाठी प्राण पणाला लावून खेळतात…’ तर आणखी एका चाहत्यानं म्हटलं, ‘बांगलादेश क्रिकेट टीमचा नवा अवतार… आजपासून कुणीही बांगलादेशला कमी समजण्याची चूक करणार नाही’.

Check Also

खारघरमध्ये गुरू तेग बहादुर यांच्या शहिदी समागमाला प्रारंभ; विविध कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे ‘हिंद दी …

Leave a Reply