Breaking News

अब की बार 220 के पार

मुंबई : प्रतिनिधी

काही वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकीआधी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, अटलबिहारी वाजपेयी रथयात्रा काढत असत. यामुळे लोकांपर्यंत पोहोचता येत होते. आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी फडणवीस राज्यातील सर्व मतदार संघांमध्ये रथयात्रा काढणार आहेत.

विधानसभेच्या 288 जागांवर पुढील काही महिन्यांत निवडणूक होणार आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निकडणुकीत भाजप, शिवसेनेच्या युतीने सर्वाधिक जागा जिंकत काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आघाडीची हवाच काढली होती. हे वातावरण विधानसभेपर्यंत तसेच ठेवण्याचा प्रयत्न फडणवीस सरकारचा आहे. शेतकरी कर्जमाफी, दुष्काळी उपाययोजना आणि मदत, जलसिंचन प्रकल्प, शेततळी, विहीरी आदींचे काम यामध्ये मांडले जाणार आहे.

विधानसभेच्या निवडणुकीला फडणवीस सरकार लागले असून मुख्यमंत्री कोणाचा होणार या वादात न पडता एकत्र काम करण्याचे आवाहन शिवसेनेच्या वर्धापनदिनावेळी मुख्यमंत्र्यांनी केले होते. या दृष्टीने पुढील ऑगस्ट महिन्यामध्ये फडणवीस रथयात्रा काढणार असून सर्वच्या सर्व 288 मतदारसंघांमध्ये फिरणार आहेत. तसेच या प्रचारावेळी ’फिर एक बार शिवशाही सरकार’ आणि ’अब की बार 220 के पार’, अशा घोषणा दिल्या जाणार आहेत.

Check Also

रायगड जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत ओमकार वेश्वी, कर्नाळा स्पोर्टस् अकॅडमी संघ विजेते

पनवेल : रामप्रहर वृत्तगोरगरिबांचे आधारस्तंभ, दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी …

Leave a Reply