Breaking News

ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिर

रसायनी ः वार्ताहर

रसायनीत ज्येष्ठ नागरिकांसाठी चांभार्ली येथील रेगे हॉस्पिटलमध्ये रसायनी व आसपासच्या परिसरातील नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर येत्या रविवारी (दि. 30) सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात ज्येष्ठ नागरिकांना डॉक्टरांकडून मोफत मार्गदर्शन मिळणार असून काही मोफत तपासण्या करण्यात येणार आहेत. यात ब्लडप्रेशर, शुगर, एचबी, आरबीएस, ईसीजी, पाठदुखी, कंबरदुखी आदी तपासण्या मोफत केल्या जाणार आहेत. तर पोटाची सोनोग्राफी अत्यल्प म्हणजे चारशे रुपयात केली जाणार आहेत. यावेली जेष्ठ नागरिकांना संपूर्ण रेगे हॉस्पिटलाच्यावतीने हेल्थकार्ड देण्यात येणार आहे.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply