Breaking News

मृत्युमुखी विद्यार्थिनीच्या नातेवाईकांस मदत

कर्जत : बातमीदार

तालुक्यातील चाफेवाडी येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत शिकत असलेली सारिका सीताराम काटे या विद्यार्थिनीचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला होता. आदिवासी विकास विभागाने त्याची दखल घेतली होती. सारिकाच्या नातेवाईकांना नुकताच मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

गेल्या वर्षी दिवाळीच्या सुट्टीमध्ये सारिका काटे ही विद्यार्थिनी वंजारवाडी येथे आपल्या वडिलांसह फार्महाऊसवर गेली होती. तेथे पेजनदीमध्ये पाण्यात वीज प्रवाह सोडून मासेमारी करीत असताना शॉक लागून आई-वडिलांसह सारिकाचा मृत्यू झाला होता. या मुलीचे आजोबा सोमा शंकर काटे यांनी आदिवासी विकास विभाग प्रकल्प कार्यालयांकडून या प्रकरणाचा पाठपुरावा केला होता. त्याला यश आले असून, सारिका हिच्या मृत्यूप्रकरणी आदिवासी विकास विभागाने दोन लाख मदत जाहीर केली. या मदतीचा धनादेश बुधवारी सारिकाचे आजोबा सोमा शंकर काटे यांना सुपूर्द केला.

Check Also

‘रयत‌’च्या शाखाप्रमुखांची सहविचार सभा

लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले मार्गदर्शन; गुणवंत शिक्षकांचा सत्कार पनवेल ः रामप्रहर वृत्तआपले कामकाज वेळच्या …

Leave a Reply