Breaking News

भाजप मुरूड तालुका उपाध्यक्षपदी समीर शिंदे

मुरूड जंजिरा ः प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टीच्या मुरुड तालुका उपाध्यक्षपदी उसरोली ग्रामपंचायत हद्दीमध्ये राहणारे तरुण व उमदे कार्यकर्ते समीर शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. मुरुड तालुका भाजप कार्यकारिणीच्या सभेत ही निवड करण्यात आली. यावेळी अलिबाग-मुरुड विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. या वेळी तालुका अध्यक्ष जयवंत अंबाजी, मुरुड शहर अध्यक्ष प्रवीण बैकर, सुरेश म्हात्रे व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. समीर शिंदे यांची या पदावर नियुक्ती केल्याने  उसरोली, मजगाव, नांदगाव या भागातील कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Check Also

झालमुरी, एसडी, आरडी आणि सुरांची अवीट मैफल!

‌‘पुरवैय्या‌’ने पनवेलकरांना दिली अविस्मरणीय सांगीतिक पर्वणी पनवेल : रामप्रहर वृत्तपश्चिम बंगालने हिंदी चित्रपटसृष्टीला अनिल विश्वास, …

Leave a Reply