Breaking News

भाजप नेते महेश बालदी यांच्या वाढदिवसानिमित्त वह्यावाटप

उरण ः वार्ताहर – जेएनपीटी विश्वस्त तथा भाजप जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी (दि. 17) उरण नगराध्यक्षा सायली म्हात्रे व भाजप शहर अध्यक्ष व नगरसेवक  कौशिक शहा यांच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत वह्यावाटप करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम नगर परिषद शाळा क्र. 1 व 2 येथे होणार आहे.

या कार्यक्रमास उरणच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविंद्र कोळी, शिक्षण सभापती तथा भाजप तालुका अध्यक्ष रवी भोईर, शहर अध्यक्ष व नगरसेवक कौशिक शहा, नगरसेविका यास्मिन गॅस, दमयंती, आशा शेलार, जान्हवी पंडित, रजनी कोळी, स्नेहल कासारे, प्रियंका पाटील, नगरसेवक राजू ठाकूर, धनंजय कडवे, मेराज शेख, नंदकुमार लांबे, शहर भाजप महिला अध्यक्षा संपूर्णा थळी आदी उपस्थित  राहणार आहेत.

जि. प. शाळा आवरे (उरण) येथे मोफत वह्या व खाऊवाटप करण्यात येणार आहे. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्षा सायली म्हात्रे, जासईचे उपसरपंच अभिजित घरत, तालुका युवा मोर्चा सरचिटणीस तेजस पाटील, भाजप युवा नेते सनी म्हात्रे, उपसरपंच आवरे हरेश्वर म्हात्रे, भाजप नवनिर्वाचित सदस्य अनिल म्हात्रे, स्वाती गावंड, युवा मोर्चा सदस्य अमित शाहू आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेलमधील कानपोलीत विकासकामे

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुभारंभ पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघात आमदार प्रशांत …

Leave a Reply