Breaking News

सुशीला घरत यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा

पनवेल : रामप्रहर वृत्त – पनवेल महापालिकेच्या नगरसेविका सुशीला घरत यांचा वाढदिवस शैक्षणिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. त्याअंतर्गत नवीन पनवेलमधील सीकेटी स्कूलमध्ये अस्मिता कला, क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळ आणि प्रियदर्शनी महिला मंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी गौरव, दाखले वाटप, तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या सत्कार समारंभाचे आयोजन सोमवारी (दि. 15) करण्यात आले होते. हा सोहळा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.

पनवेल महापालिकेच्या नगरसेविका सुशीला घरत यांचा वाढदिवस दरवर्षी विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवून साजरा करण्यात येत असतो. यंदाच्या कार्यक्रमास भाजप जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, प्रभाग समिती ‘ड’ चे अध्यक्ष तेजस कांडपिळे, नगरसेवक प्रकाश बिनेदार, मनोज भुजबळ, नगरसेविका चारुशीला घरत, वृषाली वाघमारे, राजेश्री वावेकर, ज्येष्ठ नेते सी. सी. भगत, सुहासिनी शिवणेकर, लीना पाटील, जयेश ठाकूर, विद्या वाणी आदी उपस्थित होते. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त करून सुशीला घरत यांचे कौतुक केले.

Check Also

नवी मुंबई ग्लोबल बिझनेस समिटला आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट व शुभेच्छा

नवी मुंबई : रामप्रहर वृत्तनवीन मुंबईतील यू बिझनेस मीटच्या वतीने नवी मुंबई ग्लोबल बिझनेस समिट …

Leave a Reply