Breaking News

आमदार प्रविण दरेकर यांची भाजप रायगड जिल्हा प्रभारीपदी नियुक्ती

महाड ः प्रतिनिधी

ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी भाजपा प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हा प्रभारींच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. या वेळी भाजपाच्या रायगड जिल्हा प्रभारी आमदार प्रविण दरेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरेकरांच्या या नियुक्तीने जिल्ह्यात सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे. आमदार प्रवीण दरेकर हे रायगड जिल्ह्यातील पोलादपूर या तालुक्यातील कोतलाल या गावचे सुपुत्र आहेत. आ. दरेकर हे पूर्वी भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हा प्रभारी असताना, त्यांनी संघटनात्म पक्ष वाढविण्यासाठी चांगले कार्य केले होते. तसेच रायगड लोकसभा निवडणुकीत भाजपा सेना युतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारी धुरा संभाळत असताना, भाजपा पक्षाकडून मोठ्या प्रमाणावर प्रचाराचे काम केल होते. त्यांच्या या कार्याची दखल घेत पक्षाने पुन्हा एकदा आमदार प्रविण दरेकर यांची रायगड जिल्हा प्रभारी म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल पोलादपूर तालुक्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Check Also

पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …

Leave a Reply