Breaking News

कृत्रिम पावसाच्या हालचालींना वेग

औरंगाबाद : प्रतिनिधी

 शासनाने राज्यात क्लाऊड सिडिंगद्वारा पर्जन्यवृद्धीसाठी प्रयोग करण्याचे निश्चित केले आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यासाठी ‘सी बॅण्ड डॉप्लर रडार’ विभागीय आयुक्तालयाच्या पाचव्या मजल्यावर बसविण्यात येणार आहे.

रडार बसविण्यासाठी लागणारा लोखंडी अँगलचा सांगाडा सोमवारी आयुक्तालयात दाखल झाला. क्रेनच्या साह्याने दीड टन वजनाचे लोखंडी अँगल इमारतीवर बसविण्यात येतील. 24 जुलै 2015 रोजी रडार येथे बसविण्यात आले होते. त्यानंतर दोन वर्षांनी ते सोलापूरला हलविण्यात आले. तेथील प्रयोगात समाधानकारक यश न आल्यामुळे यावर्षी पुन्हा औरंगाबाद मध्यवर्ती केंद्र म्हणून निवडले आहे. कृत्रिम पावसाच्या प्रयोगाचे विमान लॅण्ड व टेकऑफसाठी लागणार्‍या परवानग्या चिकलठाणा विमानतळ प्राधिकरणाने

दिल्या आहेत.

राज्यातील सहा प्रशासकीय विभाग येथून नियंत्रित होऊ शकतात. त्यामुळे औरंगाबाद मध्यवर्ती केंद्र म्हणून निवडले आहे. रडारची क्षमता 400 क़िमीपर्यंत असते. औरंगाबाद हे केंद्र निवडण्यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे येथून मुंबई, पुणे, अकोला, जळगाव-धुळे, अहमदनगर, सोलापूर, सांगली, सातारा आणि पूर्ण मराठवाड्यातील परिसरातील दुष्काळग्रस्त भाग 400 ते 450 क़िमीच्या आसपास आहे.

‘सी बॅण्ड डॉप्लर’ रडार व पावसासाठी वापरण्यात येणारे सोडियम अ‍ॅण्ड सिल्व्हर आयोडाईडचे ‘एरोसोल्स’ ढगांची गर्दी तपासून त्या दिशेने नळकांड्या सोडण्यात येतात. ‘सी बॅण्ड डॉप्लर’ रडारच्या साह्याने ढंगाचे स्कॅनिंग केले जाते. त्यात किती पाणी, पडण्याची क्षमता कशी, किती किमीच्या रेंजमध्ये पाणी पडेल, याचा अंदाज लावण्यात येतो. त्यानुसार विमानाच्या साह्याने नळकांड्या ढगात सोडतात व ते ढग दाटून येऊन त्या भागात पावसाच्या सरीहोऊन बरसतात.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांना महाराष्ट्र प्रदेश भाजप चिटणीसपदाची मोठी जबाबदारी

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा …

Leave a Reply