Breaking News

संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनचे श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालय परिसरात स्वच्छता अभियान

श्रीवर्धन : प्रतिनिधी

सद्गुरू बाबा हरदेवसिंग महाराज यांच्या 65व्या

जयंतीनिमित्त संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या वतीने श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालय परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तालुक्यातील भरडखोल, मामवली, गालसुरे येथील 100पेक्षा जास्त सेवकांनी त्यात सहभाग घेतला होता. सेवकांनी हाती घमेले आणि झाडू घेऊन रुग्णालय व परिसरातील कचरा गोळा करून तो डम्पिंग ग्राऊंडवर टाकला. नगर परिषदेनेही त्यासाठी सहकार्य केले. या वेळी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ढवळे, डॉ. भरणे, नगरसेवक अनंत गुरव, दिनेश चोगले, सत्यवान थळे यांसह रुग्णालय कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

Check Also

‌‘नेहले पे देहला‌’ @ ५० वर्षे; पडद्यामागच्या गोष्टी जास्त रंजक

सुनील दत्तच्या वांद्य्रातील पाली हिलवरील अजंठा बंगल्यातील तळघरात असलेल्या मिनी थिएटरमध्ये एखादा चित्रपट अथवा गाणी …

Leave a Reply