Breaking News

युवकांचा भाजपमध्ये प्रवेश

अलिबाग : प्रतिनिधी

भाजपची विकासकामे पाहता अनेक जण पक्षात प्रवेश करीत आहेत. त्याअनुषंगाने अनेक युवकांनी भाजपमध्ये गुरुवारी पक्षप्रवेश केला. प्रवेशकर्त्यांचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी स्वागत केले. भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेऊन आणि होत असलेली विकास कामे पाहता अनेक जण पक्षात प्रवेश करीत आहेत. त्यामध्ये भोकरपाड्याचे वसंतशेठ आगिवले, संतोष आगिवले, हेमंत शिंदे, राकेश पाटील, सागर आगिवले, अमिर पाटील, महेश पाटील यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. या वेळी प्रवीण खंडागळे उपस्थित होते.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इन्व्हेस्टिचर सेरेमनी

उलवे नोड ः रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या उलवे नोडमधील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply