Breaking News

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे लंगडी खेळाडूंना आर्थिक मदत

पनवेल : रामप्रहर वृत्त

आमदार प्रशांत ठाकूर अध्यक्ष असलेल्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे लंगडी खेळाडूंना आर्थिक मदत करण्यात आली आहे. मदतीचा धनादेश मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 26) खेळाडूंकडे सुपूर्द करण्यात आला.

बॉक्स लंगडी असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या वतीने आयोजित स्पर्धेसाठी रायगड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून प्रथमच सहा मुलांची निवड करून त्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये संस्कार सुर्वे, रुद्राक्ष पाटील, ओमकार गाडेकर, प्रशांत यादव, ओमकार शेलार, संचित भगत यांचा समावेश आहे. ही स्पर्धा 26 ते 28 जुलै रोजी शिर्डी येथे होणार आहे. या स्पर्धेसाठी रायगडातून झालेल्या निवड झालेल्या खेळाडूंना श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे आर्थिक मदत करण्यात आली. याबद्दल खेळाडूंनी मंडळाचे आभार मानले.

Check Also

पनवेल चेरीवली शाळेला संगणक, सीसीटीव्ही आणि वायफाय सुविधा

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते साहित्य सुपूर्द पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्हा परिषदेची पनवेल तालुक्यातील …

Leave a Reply