म्हसळा : प्रतिनिधी – शिवसेना दक्षिण रायगड जिल्हाप्रमुखपदी माणगाव तालुकाप्रमुख अनिल नवगणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख मुंडे यांनी राजीनामा दिल्यामुळे ते पद रिक्त झाले होते. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी अनिल नवगणे यांची दक्षिण रायगड जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. म्हसळा तालुक्यातून माजी सभापती महादेव पाटील, शहरप्रमुख अनिकेत पानसरे, माजी उपतालुकाप्रमुख सुरेश कुडेकर, शहर संघटक कल्पेश जैन, युवा सेना उपशहर अधिकारी कौस्तुभ करडे यांच्यासह शिवसैनिकांनी नवगणे यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
Check Also
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा शनिवारी ‘रयत’तर्फे हृद्य सत्कार
संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते होणार गौरव सातारा : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या …
RamPrahar – The Panvel Daily Paper