Breaking News

महादेव कोळी समाज महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी बैठक यशस्वी

पनवेल ः रामप्रहर वृत्त

महादेव कोळी समाजाचे दाखले व आपल्या समाजाच्या प्रश्नासंदर्भात येत्या पंधरा दिवसात शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली जाईल, अशी माहिती अखिल भारतीय कोळी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष गुजरातचे कॅबिनेट मंत्री कुबर बावलिया यांनी दिली. अखिल भारतीय कोळी समाजाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची आढावा बैठक शनिवारी (दि 10) रोजी जळगावातील गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या जैन हिल्स कस्तुरबा हॉलमध्ये झाला. या मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. दीपप्रज्वलनाने या बैठकीची सुरुवात झाली. यानंतर कार्यकारिणीची बैठक झाली. यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कांतीभाई कोळी, माजी राष्ट्रीय अध्यक्ष सत्यनारायण पवार, युवकचे प्रदेश अध्यक्ष परेश कोळी, महिला अध्यक्षा पुष्पाताई कोळी, महाराष्ट्र उपाध्यक्ष बंडूशेठ पाटील, रायगड जिल्हाध्यक्ष विश्वनाथ कोळी, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष गणेश वैती यांच्यासह संपूर्ण देशभरातील जिल्हाध्यक्ष, महिला, युवक कमिट्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीचे उत्तम नियोजन जळगाव जिल्हाध्यक्ष दिनेश सोनवणे, राष्ट्रीय संघटक प्रदिप नवसारे, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य गणेश सोनावणे, राज्य सचिव अ‍ॅड. वसंत भोलाणकर, उपाध्यक्ष अनिल नन्नवरे, युवा जिल्हाध्यक्ष धनराज साळुंखे व त्यांच्या सहकार्‍यांनी केले होते.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply