Breaking News

पेण बँक संघर्ष समितीकडून खासदार बारणेंचे आभार

खोपोली ः वार्ताहर

बुडीत पेण को. अर्बन बँक आर्थिक घोटाळा व ठेवीदारांच्या थकीत देणीबाबत मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी देशाचे सर्वोच्च व्यासपीठ असलेल्या लोकसभेत दोन वेळा चर्चा घडवून आणली.

या चर्चेत संबंधित विभागाच्या मंत्रालयाने सकारात्मक कार्यवाही करून लवकरात लवकवर ठेवीदारांना त्यांची थकीत देणी देण्याचे आश्वासन दिले. खासदार बारणे यांच्या या कामगिरीबद्दल पेण बँक संघर्ष समिती व ठेवीदारांनी शनिवारी बारणे यांची भेट घेऊन त्यांचे आभार व्यक्त केले. या वेळी पेण बँक आर्थिक घोटाळा, देणी रखडण्याची प्रमुख तांत्रिक कारणे व दोषींवर कायद्याच्या चौकटीत योग्य कारवाई होण्याबाबत संघर्ष समिती पदाधिकारी व खासदार बारणे यांच्यात सविस्तर चर्चा झाली. खोपोली शिवसेना शहरप्रमुख व गटनेते सुनील पाटील यांच्या पुढाकाराने ही भेट व चर्चा घडविण्यात आली. या वेळी संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक नरेंद्र जाधव, पदाधिकारी रमाकांत पाटील, विद्या दाते, गटनेते सुनील पाटील, युवा सेनेचे सिध्दांत  शेलार, सामाजिक कार्यकर्ते शशिकांत खरात व संघर्ष समितीचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Check Also

रोटरी क्लबच्या पैठणी महोत्सवाचे उद्घाटन

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्तरोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या वतीने …

Leave a Reply