उरण : वार्ताहर
पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली व कोल्हापूर येथील पूरग्रस्त बांधवांसाठी भारतीय जनता पक्ष उरण, व्यापारी असोसिएशन, नगर परिषद आणि मोरा मच्छीमार सोसायटी यांच्या वतीने उरण शहरात शनिवारी (दि. 10)
मदतफेरी काढण्यात आली होती. या स्तुत्य उपक्रमास नागरिकांचा प्रतिसाद लाभला. जमा झालेली आर्थिक मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात येणार आहे.
या मदत फेरीत भाजप रायगड सरचिटणीस तथा जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी, उरणच्या नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन्द्र कोळी, भाजप तालुकाध्यक्ष रवी भोईर, शहर अध्यक्ष कौशिक शहा, जिल्हा चिटणीस चंद्रकांत घरत, सोनारी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच महेश कडू, तालुका उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर, सरचिटणीस सुनील पाटील, नवीन राजपाल, मनन पटेल, मदन कोळी, अॅड. पराग म्हात्रे, रोशनलाल मेहता, चंद्रकांत गायकवाड, भालचंद्र म्हात्रे, तनसुख जैन, नित्यानंद भोईर, नरेश गावंड, लायन्स क्लब ऑफ उरणचे अध्यक्ष डॉ. अमोल गिरी, उपाध्यक्ष प्रकाश नाईक, सदानंद गायकवाड, उरण व्यापारी असोसिएशनचे हसमुख मेहता, चंद्रकांत ठक्कर, समीर तेलंगे, नरेंद्र ठाकूर, नगरसेवक-नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
उरण शहरातील गणपती चौक येथून मदत फेरीस सुरुवात झाली. पुढे राजपाल नाका, पालवी हॉस्पिटल, कोट नाका, महात्मा गांधी चौक, फूल मार्केट, आपला बाजार, स्वामी विवेकानंद चौक येथे फिरून मदत फेरीचा भाजप कार्यालय येथे समारोप झाला.
RamPrahar – The Panvel Daily Paper