Breaking News

‘सीकेटी’च्या विद्यार्थ्यांचा सामाजिक कार्यात सहभाग

पनवेल ः रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, खांदा कॉलनी, नवीन पनवेल येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी रक्षाबंधनाचा सण कुष्ठरोग बांधवांसमवेत साजरा केला.

महाविद्यालयातील ध्वजारोहणानंतर शांतिवन, नेरे येथे हा कार्यक्रम झाला.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत राष्ट्रीय सेवा योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. सूर्यकांत परकाळे यांनी केले. या वेळी त्यांनी  संस्थेचे  कार्याध्यक्ष  रामशेठ ठाकूर, संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, आमदार तथा भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत ठाकूर, उपकार्याध्यक्ष  वाय. टी. देशमुख यांचा संस्थेच्या यशस्वी घोडदौडीत असणार्‍या योगदानाबद्दल त्यांनी उपस्थितांना माहिती दिली. त्याचबरोबर त्यांनी राष्ट्रीय सेवा योजना व कुष्ठरोग निवारण समिती, शांतिवन, नेरे यांच्या ऋणानुबंधाबद्दल माहिती दिली. प्रमुख पाहुण्या म्हणून उषाताई जाधव उपस्थित होत्या. प्रमोद ठाकूर, कार्याध्यक्ष शांतिवन नेरे यांनी मार्गदर्शन केले. डॉ. योजना मुनीव यांनी सर्वांचे आभार मानले. प्राचार्य डॉ. वसंत बर्‍हाटे व उपप्राचार्य डॉ. एस. के. पाटील यांनी विशेष मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे मुख्य कार्यक्रम अधिकारी प्रा. सूर्यकांत परकाळे, कार्यक्रम अधिकारी प्रा. गणेश साठे, प्रा. सत्यजित कांबळे, प्रा. सागर खैरनार, डॉ. योजना मुनीव यांनी परिश्रम घेतले.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply