Breaking News

पनवेल, उरणमधून पूरग्रस्तांना मदतीचा ओघ

नगरसेवक राजेंद्र शर्मा यांची मदत

कळंबोली : रामप्रहर वृत्त

पनवेल महानगरपालिकेचे कार्यक्षम नगरसेवक राजेंद्र  शर्मा यांनी 34 फूट लांबीच्या कंटेनरमधून सांगली, कोल्हापूरमधील पूरग्रस्तांसाठी मदत पाठवली आहे.  शर्मा यांच्या प्रयत्नांतून जीवनावश्यक वस्तू, तसेच वस्त्र व इतर समान देण्यात आले. सोमवारी (दि. 12) रात्री एक कंटेनर भरून सामान सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त कुटुंबांना मदत म्हणून पाठविण्यात आले. मदत करण्याचे आवाहन लोकनेते रामशेठ ठाकूर व सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले होते, त्याला राजेंद्र शर्मा यांनी साथ दिली.

Check Also

‌‘एसआयआर‌’संदर्भात सर्वपक्षीय शिष्टमंडळाची प्रशासनाशी चर्चा

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय निवडणूक आयोगाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियानाच्या …

Leave a Reply