Breaking News

खालापुरात एसटीला किरकोळ अपघात

खालापूर, खोपोली : प्रतिनिधी

मुंबईहून पुण्याकडे जाणार्‍या एसटीच्या निमआराम बसला (एमएच-20, बीएल-3323) महामार्गावरील चौक गावाच्या हद्दीत शनिवारी (दि. 24)सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. सुदैवाने त्यात कोणालाही दुखापत झाली नाही. एसटी बस शनिवारी सकाळी मुंबईहून पुण्याकडे जात होती. जुन्या महामार्गावरील चौक गावाजवळील रामानंद सागर फार्म हाऊससमोर एक मोटारसायकलस्वार अचानक समोर आल्याने एसटीचालकाने प्रसंगावधान दाखवत तत्काळ ब्रेक लावला. त्यामुळे एसटी घसरली व महामार्गाच्या बाजूला जाऊन थांबली. घटनेचे वृत्त समजताच एसटी महामंडळ अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त बसमधील प्रवाशांना दुसर्‍या बसने पुणे बाजूकडे रवाना केले.

Check Also

भाजपकडून महिला सक्षमीकरणासाठी बळ दिले जाते -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष नेहमीच महिलांना शक्ती देण्याचे आणि त्यांना सक्षम करण्याचे काम …

Leave a Reply