Breaking News

यंदा नवरात्रोत्सवही होणार साधेपणाने साजरा

गरबा, दांडिया खेळण्यास बंदी

मुंबई : प्रतिनिधी
राज्यात कोरोना रुग्णांमध्ये दररोज होत असलेली वाढ, ग्रामीण भागातही रुग्णांची झपाट्याने वाढत असलेली संख्या पाहता कोरोनाच्या कालावधीत आलेले सण-उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरे करण्यात आले, मात्र गणेशोत्सवानंतर रुग्णांच्या संख्येतील वाढ लक्षात घेता येत्या 17 ऑक्टोबरपासून सुरू होणारा नवरात्रोत्सव साध्या पद्धतीन साजरा करण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे. या नवरात्रीत गरबा, दांडिया खेळण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे.
नवरात्राोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गृह विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. कोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यंदाचा नवरात्रोत्सव, दुर्गापूजा, दसरा साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सार्वजनिक नवरात्रोत्सवासाठी मंडळांनी स्थानिक प्रशासनाची त्यांच्या धोरणानुसार पूर्वपरवनागी घेणे आवश्यक असणार आहे तसेच मर्यादित स्वरूपाचे मंडप उभारण्यात यावेत अशी सूचना करण्यात आली आहे. या वर्षीचा नवरात्रोत्सव साध्या पद्धतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती देवीची उंची दोन फूट आणि सार्वजनिक देवीच्या मूर्तीची उंची चार फूट ठेवून त्या अनुषंगाने सजावट करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.  
आरोग्यविषयक उपक्रम राबवा
गरबा, दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करू नयेत. त्याऐवजी आरोग्यविषयक उपक्रम राबवावेत. शिबिरे आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू आदी निर्मूलनासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेबाबतदेखील जनजागृती करण्यात यावी, असे सूचित केले गेले आहे.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply