स्वित्झर्लंड : भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने इतिहासातील अपयशावर मात करीत स्वित्झर्लंड येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरले आहे. सिंधूने जपानच्या नोझोमी ओकुहाराचा 21-7, 21-7 असा सरळ पराभव करीत धूळ चारली. अशी कामगिरी करणारी सिंधू ही पहिलीच भारतीय खेळाडू ठरली आहे. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सिंधूने तिसर्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला होता. यापूर्वी जागतिक पातळीवरील या स्पर्धेत सिंधूला दोन वेळा विजेतेपदाने हुलकावणी दिली होती. मागील अपयशावर मात करीत सिंधूने अखेर जेतेपदाला गवसणी घातली.
Check Also
आमदार प्रशांत ठाकूर अभियंता प्रकोष्ठ प्रदेश प्रभारीपदी
भाजपच्या संघटनात्मक विस्तारात नव्या जबाबदारीची भर पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस …
RamPrahar – The Panvel Daily Paper