Breaking News

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणार्‍या मार्गावर शिवस्मारक आणि शिवमुद्रा उभारणार

मंत्रालयात बैठक : मंत्री आशिष शेलार यांचे कार्यवाहीसाठी निर्देश

मुंबई ः प्रतिनिधी
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणार्‍या रस्त्यावर अटल सेतूजवळ शिवस्मारक व शिवमुद्रा उभारण्यात येणार आहे. त्यासाठी सिडकोमार्फत कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांनी मंगळवारी (दि. 16) दिले. या संदर्भात आमदार महेश बालदी यांच्या पुढाकाराने मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीला राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, सचिव डॉ.किरण कुलकर्णी, नवी मुंबईचे महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे, सिडको आणि एमएमआरडीचे अधिकारी उपस्थित होते.
या वेळी माहिती देताना मंत्री आशिष शेलार म्हणाले की, महाराष्ट्राला समृद्ध ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा आहे. या वारशाची माहिती सर्वांना असणे गरजेचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड या राजधानीच्या जिल्ह्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जगभरातील पर्यटक येतील, त्या वेळी महाराष्ट्राची संस्कृती माहिती होण्यासाठी अटल सेतूजवळ शिवस्मारक व शिवमुद्रा उभारण्याबाबत सिडकोने निधी मागणीचा प्रस्ताव तयार करावा आणि तो शासनाकडे सादर करून मान्यता घेत या कामाला गती द्यावी. सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी शिवस्मारक व शिवमुद्रा उभारण्याच्या अनुषंगाने विविध विभागांच्या परवानग्या घेण्यात याव्यात, असेही ना. शेलार यांनी सांगितले.

Check Also

पनवेल महापालिकेच्या नूतन महापौर निवासस्थानाचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील सेक्टर २१मध्ये उभारण्यात आलेल्या ‘शिवनेरी’ या भव्य …

Leave a Reply