कामोठे : रामप्रहर वृत्त
ग्रीन व्हॅली प्रॉपर्टीज व ग्रीन व्हॅली फाऊंडेशन, नालंदा बुद्धविहार ट्रस्ट कामोठे आणि सातारा-जावळी नवी मुंबई रहिवासी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा भव्य नागरी सत्कार रविवारी (दि. 25) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते कामोठ्यात करण्यात आला.
कामोठे येथील सुषमा पाटील विद्यालयात झालेल्या या सत्कार सोहळ्यास सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार डॉ. कांता नलावडे, भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक जगदीश गायकवाड, पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती ‘क’चे अध्यक्ष गोपीनाथ भगत, नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, विजय चिपळेकर, विकास घरत, दिलीप पाटील, नगरसेविका मोनिका महानवर, संतोषी तुपे, कुसुम म्हात्रे, कामोठे शहर उपाध्यक्ष राजेश गायकर, युवा मोर्चा शहर अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, युवा नेते हॅप्पी सिंग, आरपीआयचे कामोठे शहर सरचिटणीस गौतम कांबळे, ग्रीनव्हॅली फाऊंडेशनचे अध्यक्ष जीवन जाधव, उपाध्यक्ष संदीप माने, राजेश वंजारी, नालंदा बुद्ध विहारचे अध्यक्ष सविंद्र कांबळे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper