Breaking News

दांडफाट्याजवळ एसटीला अपघात; पाच प्रवासी जखमी

खालापूर, खोपोली : प्रतिनिधी

मुंबई-पुणे महामार्गावर दांडफाट्याजवळ सोमवारी (दि. 26) एसटी बस तीव्र उतारावरून खड्ड्यात जाऊन उलटली. या अपघातात पाच प्रवासी जखमी झाले असून त्यांना कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात दाखल

करण्यात आले आहे.

बोरिवली-करमाळा एसटी बस (एमएच 14-बीटी 4689) पनवेलहून खोपोलीच्या दिशेने जात असताना सकाळी 11च्या सुमारास दांडफाट्याजवळ भोकरपाडा गावाच्या हद्दीत असलेल्या मोठ्या वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस खड्ड्यात जाऊन उलटली. या अपघातात नितीन लोटके (रा. अहमदनगर), सचिन चांदणे (दौंड), पापू रोकडे (लोणावळा), पुष्पा तानाजी कांबळे व रंजना पोहोकर (दोघीही राहाणार पुणे) जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कळंबोली एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Check Also

उलवे नोडमध्ये रविवारी महासंस्कृती : जागर स्त्री शक्तीचा सांस्कृतिक कार्यक्रम

भजनी मंडळांना भांडवली अनुदानाचे होणार वाटप पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि …

Leave a Reply