Breaking News

सरकारी कंपन्या व कामगार वाचवा!; कामगारविरोधी धोरणाबाबत निवेदन

पनवेल ः रामप्रहर वृत्त

भारतीय मजदूर पोर्ट अ‍ॅण्ड डॉक मजदूर संघाचे उपाअध्यक्ष व जेएनपीटी जनरल कामगार संघाचे अध्यक्ष सुरेश पाटील यांच्यासह अनेक संघटना तसेच कामगारांच्या वतीने ‘सरकारी कंपन्या व कामगार वाचवा’ व कामगारांच्या प्रश्नासंदर्भात जेएनपीटीत मंगळवारी दि.27) जोरदार निदर्शने केली.

 जेएनपीटीचे मुख्य व्यवस्थापक जयवंत ढवळे आणि उपव्यवस्थापक संजीव पगारे यांच्याकडे याबाबतचे निवेदन देण्यात आले आणि हे निवेदन केंद्रीय मंत्री मन्सूख मांडविया यांच्यापर्यंत पोहचविण्याची विनंती करण्यात आली. यावेळी जेएनपीटी जनरल कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष सुधीर घरत, जेएनपीटीचे विश्वस्त रविंद्र पाटील, सेक्रेटरी जनार्दन बंडा आदी कामगार प्रतिनिधी आणि कामगार उपस्थित होते.

Check Also

लगान @२५ वर्षे; क्लासिक चित्रपट, ऑस्करला नामांकन…

काळ १८९३चा. म्हणजे आपल्या अखंड हिन्दुस्थानचा. दीडशे वर्षांपूर्वीचा…स्थळ आपल्या देशातील मध्य भागातील चंपानेर हे अतिशय …

Leave a Reply