उरण ः रामप्रहर वृत्त
कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयामध्ये सोमवारी (दि. 26) व्यवसाय मार्गदर्शन केंद्र आणि अर्थशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यामाने आणि प्रिटिजन टेक्नॉलॉजीचे अमित आमले आणि श्री. गणेश यांच्या सहकार्याने शेअर बाजारातील व्यवसाय आणि नोकरीची संधी याविषयी कार्यशाळा घेण्यात आली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन अमित आमले यांच्या हस्ते झाले. महाविद्यालयाचे ज्येष्ठ प्राध्यापक व्ही. एस. इंदुलकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. हा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य के. ए. शामा यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. या कार्यशाळेत शेअर बाजार म्हणजे काय, त्याचे कार्य, प्रकार, गुंतवणूक, उत्पन्न, उत्पादन, शेअर बाजाराची कार्यपध्दती, गुंतवूणक परतावा याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच प्रत्येक व्यक्तींनी आपणास मिळणार्या उत्पन्नापैकी काही हिस्सा गुंतवणूक करावी आणि ती देखील मूच्युअल फंड, शेअर्स यांचा अभ्यास करुन गुंतवणूक करावी आणि त्याचा फायदा घ्यावा, याविषयी चर्चा झाली. दुसर्या सत्रात परिचय डॉ. पी. आर. कारुळकर यांनी करुन दिला व आभार प्रा. एच. के. जगताप यांनी मानले. कार्यशाळेत प्रा. ठावरे, प्रा. जे. के. कोळी, प्रा. हन्नत, प्रा. रियाज उपस्थित होते. या सत्रामध्ये प्रा. गायकवाड यांनी स्वागत केले. डॉ. चव्हाण यांनी प्रास्ताविक केले.