स्थायी समितीच्या सभेत मंजुरी
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सभा मंगळवारी (दि. 27) सभापती प्रवीण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत मनपा सभागृहात झाली. या वेळी विविध विषयांवर चर्चा करून त्यांना मंजुरी देण्यात आली.
स्वच्छ भारत अंतर्गत भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. यांच्या सीएसआर फंडातून 20 मोबाइल टॉयलेट खरेदी करण्यास या सभेत मान्यता देण्यात आली. त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 1मधील एमआयडीसी ते बॉम्बे वेस्ट मॅनेजमेंट कंपनी ते करवले ते तळोजे मजकूर ते तळोजे फेज 2पर्यंतचा रस्ता उन्नतीकरण करण्यासाठी निविदेस मान्यता देणे यांसारख्या विषयांवर चर्चा करून त्यांना मंजुरी देण्यात आली. या सभेस नगरसेवक अजय बहिरा, मुकीद काझी, नगरसेविका सीता पाटील, आरती नवघरे, वृषाली वाघमारे, मोनिका महानवर, प्रमिला पाटील, संतोषी तुपे आदी उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper