Breaking News

कोपर येथील भव्य गणेश मंदिराचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल तालुक्यातील कोपर येथील पुष्पक नोड या नवी मुंबई विमानतळबाधितांच्या पुनर्वसन आणि पुन:स्थापना क्षेत्रात भव्य असे श्री स्वयंभू चिंतामणी गणेश मंदिर उभारण्यात आले आहे. या मंदिराचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आणि सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि. 8) करण्यात आले. या मंदिर उद्घाटन सोहळ्यास सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक अश्विन मुदगल, अतिरिक्त मुख्य भूमी व भूमापन अधिकारी डॉ. संदीप माने, उद्योजक कान्हाशेठ ठाकूर, सिडको एम्प्लॉइज युनियनचे अध्यक्ष निलेश तांडेल, मुख्य अभियंता धाताटकर, दहागाव अध्यक्ष नाथा पाटील, राम मराठे, सिडको जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे तसेच विश्वास पाटील, सतिश धुमाळ, तुकाराम पाटील, शामशेठ धुमाळ, सुरेश धुमाळ, रूपेश धुमाळ यांच्यासह पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

अमर भूपाळी होनाजी बाळा @७५ वर्षे : एक संगीतमय अजरामर कलाकृती

भारतीय चित्रपटसृष्टीच्या वाटचालीतील काही दर्जेदार (क्लासिक) चित्रपट पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात आणि त्यात पुनर्प्रत्ययाचा आनंद …

Leave a Reply