Breaking News

व्हॉलीबॉल स्पर्धेत ‘आरटीपीएस’ विजेता

खारघर : रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल (आरटीपीएस)मधील विद्यार्थ्यांच्या संघाने पनवेल महानगरपालिका अंतर्गत झालेल्या जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत विजेतेपद पटकाविले आहे.

रायगड जिल्हास्तरीय 19 वर्षांखालील मुलांची व्हॉलीबॉल स्पर्धा बुधवारी (दि. 28) खारघर येथील बालभारती पब्लिक स्कूलमध्ये झाली. या स्पर्धेत आरटीपीएस विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन विजेतेपदावर नाव कोरले.

यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणार्‍या मंदार मुंबईकर यांचे संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख व शाळेच्या मुख्याध्यापिका राज अलोनी यांनी विशेष कौतुक करून अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Check Also

दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार

रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …

Leave a Reply