Breaking News

कॅरम स्पर्धेत ‘सीकेटी’ विद्यालयाचे सुयश

पनवेल : रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत सुयश संपादन केले आहे.

पिल्लई ग्लोबल अ‍ॅकॅडमी येथे झालेल्या कॅरम स्पर्धेत सीकेटी विद्यालयाच्या निमेश मोरे याने प्रथम क्रमांक पटकाविला, तर साहिल राठोडने पाचवे स्थान प्राप्त केले. दोन्ही विद्यार्थ्यांची मुंबई विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, अध्यक्ष अरुणशेठ भगत, प्राचार्य, पर्यवेक्षिका, सर्व पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Check Also

दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार

रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …

Leave a Reply