Breaking News

प्रस्थापितांना आज भाजपचा आणखी एक धक्का!

पनवेलमध्ये पक्षप्रवेश सोहळ्यासह कार्यकर्ता मेळावा

पनवेल : रामप्रहर वृत्त

उरण विधानसभा मतदारसंघातील शेकाप, काँग्रेस, शिवसेना या पक्षांच्या असंख्य दिग्गज पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पक्षात जाहीर पक्षप्रवेश सोहळा व कार्यकर्ता मेळावा रविवारी (दि. 1) सकाळी 10.30 वाजता पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार आहे.               

या वेळी प्रमुख मान्यवर म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार देवेंद्र साटम, जिल्हा सरचिटणीस व जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, खालापूर तालुकाध्यक्ष बापू घारे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

 20 दिवसांपूर्वी मोहोपाड्यात झालेल्या कार्यक्रमात शेकाप, काँग्रेस, शिवसेना व इतर पक्षांतील दिग्गज पदाधिकारी व हजारो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. नुकत्याच झालेल्या या प्रवेशानंतर रविवारी होणार्‍या प्रवेशामुळे शेकाप, काँग्रेस व शिवसेनेला आणखी एक जोरदार धक्का बसणार आहे.

Check Also

सुभाष घईंच्या दिग्दर्शनाची यशस्वी पन्नाशी

तुम्हालाही माहित्येय आज आपण डिजिटल युगात वावरतोय, चित्रपट माध्यमात व्हीएफएक्स आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढलाय, …

Leave a Reply