Breaking News

सावळे उपसरपंचपदी अमृता म्हसकर

पनवेल ः रामप्रहर वृत्त

पनवेल तालुक्यातील सावळे ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पार्टीची सत्ता असून उपसरपंचपदी गुरुवारी (दि. 5) अमृता म्हसकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.

उरण मतदारसंघातील सावळे ग्रुपग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भारतीय जनता पार्टीच्या अमृता म्हसकर यांची बिनविरोध निवड झाली.

या वेळी भारतीय जनता पार्टीचे नेते राज्य परिषद सदस्य विनोद साबळे, गुळसुंदे विभागीय अध्यक्ष प्रवीण खंडागळे, पोयंजे पंचायत समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर सुर्वे, पंचायत समिती सदस्य तनुजा टेंबे, तालुका उपाध्यक्ष संजय टेंबे, सरपंच शिवाजी, माळी माजी सरपंच अविनाश गाताडे, संतोष माळी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या वेळी उपस्थित मान्यवरांनी उपसरपंच अमृता म्हसकर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Check Also

‘सामना’ पन्नाशीचा झाला…

काही कलाकृतींचे महत्त्व व अस्तित्व हे कायमच अधोरेखित होत असते. ते चित्रपटगृहातून उतरले तरी त्यांचा …

Leave a Reply