Breaking News

रायगडच्या दोघांची वॉटरपोलो संघात निवड

पाली : प्रतिनिधी

एशियन एज ग्रुप भारतीय वॉटरपोलो संघात रिलायन्स नागोठणे येथील राज विनायक पाटील व वेदांत उद्धव कुथे यांची निवड झाली आहे. खेडेगावात वास्तव्यास असलेल्या या खेळाडूंनी जलतरण क्षेत्रात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मजल मारली आहे. त्यांना प्रशिक्षक दत्ता तरे यांचे मार्गदर्शन लाभले. 

रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष अविनाश श्रीखंडे, उपाध्यक्ष चेतन वाळंज, विनय किर्लोस्कर, अजिंक्य पाटील, राजहंस, उदय दिवेकर, अशोक विधाते, एम. बी. वैष्णव तसेच झोतीरपाडाच्या सरपंच ज्योती दत्ता तरे, बेणसे सरपंच पारधी, उपसरपंच उद्धव कुथे, विनायक पाटील, सामाजिक कार्यकर्ते जयवंत कुथे, माजी सरपंच नरेश पाटील, संदीप पाटील, कामगार नेते साधुराम मालुसरे, अरुण कुथे, आप्पा भोय आदींनी भारतीय वॉटरपोलो संघात निवड झाल्याबद्दल राज पाटील व वेदांत कुथे यांचे अभिनंदन केले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Check Also

दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार

रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …

Leave a Reply