Breaking News

रायगड जिल्हा खो-खो असोसिएशनच्या कार्यवाहपदी आशिष पाटील यांची निवड

अलिबाग : प्रतिनिधी

रायगड जिल्हा कॅरम असोसिएशनच्या कार्यवाहपदी रायगड जिल्हा खो-खो संघाचा माजी कर्णधार राष्ट्रीय खेळाडू  आशिष पाटील याची निवड करण्यात आली. रायगडभूषण पुरस्कार विजेते दीपक मोकल यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली.

रायगड जिल्हा खो-खो असोसिएशनची वार्षिक सभा नुकतीच अलिबाग येथील जनरल अरुणकुमार वैद्य विद्यालयात झाली. या सभेत जमाखर्च मंजूर करण्यात आला. छत्रपती पुरस्कार विजेते नथुराम पाटील यांनी शासकीय परिपत्रकानुसार वयोमर्यादेनुसार कार्यवाहपदाचा राजीनाम दिला होता. त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या कार्यवाहपदी आशिष पाटील यांनी निवड करण्यात आली.

निलेश केणी यांनी खजिनदारपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या खजिनदारपदी दीपक मोकल यांची निवड

करण्यात आली. रायगड जिल्हा खो-खो आसोसिएशनचे अध्यक्ष विजय मोरे, उपाध्यक्ष सूर्यकांत ठाकूर, सहकार्यवाह पुरुषोत्तम पिंगळे, बी. डी. गायकवाड, अमोल मोरे यांनी नथुराम पाटील यांनी क्रीडक्षेत्रात केलेल्या कार्याचा गौरव केला व नवीन पदाधिकार्‍यांना शुभेच्छा दिल्या.

Check Also

उलवेत 13 मे रोजी लोकनेते रामशेठ ठाकूर अमृतमहोत्सवी अभीष्टचिंतन सोहळा; शाळा इमारतीचे उद्घाटन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार, भाजपचे …

Leave a Reply