पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने खैरणे येथे गुरुवारी (दि. 26) झालेल्या बैठकीत शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेसच्या वलप येथील अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षप्रवेशकर्त्यांचे स्वागत केले.
या बैठकीस भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, भूपेंद्र पाटील, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस प्रल्हाद केणी, दशरथ म्हात्रे, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर आदी उपस्थित होते.
या वेळी वलप येथील शेकाप व काँग्रेसचे राम गणपत पाटील, नरेश बामा पाटील, नारायण उंदर्या सांगडे, हिरामण सावळाराम सांगडे, लक्ष्मण आंबो पाटील, आत्माराम टेंबे, लक्ष्मण नामा पाटील, चंद्रकांत बामा पाटील, प्रतीक नागा पाटील, विजय रघुनाथ पाटील, राजेश हिरामण सांगडे, आकाश लक्ष्मण पाटील, प्रतीक गजानन पाटील, शुभम रमेश पाटील, रोहन हरिदास टेंबे, विरेश लक्ष्मण पाटील, महेंद्र चांगा पाटील, आशिष भरत पाटील, जीवन भरत पाटील आदींनी भाजपचा झेंडा हाती घेतला.
RamPrahar – The Panvel Daily Paper