Breaking News

भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याची ठिकाणे बदलणार नाहीत

हैदराबाद : वृत्तसंस्था

भारत-ऑस्ट्रेलिया वन-डे क्रिकेट मालिकेतील मोहाली व नवी दिल्ली येथे होणार्‍या सामन्यांची ठिकाणे बदलण्याचे कोणतेही नियोजन नसल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शुक्रवारी स्पष्ट केले.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढत असल्यामुळे 10 मार्च रोजी मोहाली आणि 13 मार्च रोजी नवी दिल्ली येथे होणारे सामने अन्यत्र हलवण्याची चर्चा रंगली होती. भारत-पाकिस्तानमधील तणावाचे वातावरण लक्षात घेता हा निर्णय घेतला जाईल, अशी चर्चा होती. शुक्रवारी बीसीसीआयने या चर्चेला पूर्णविराम दिला.

Check Also

पनवेलमध्ये एसआयआर कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा

पनवेल ः रामप्रहर वृत्तभारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या मतदार याद्यांचा विशेष …

Leave a Reply