महानगरपालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केले स्वागत
पनवेल ः रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्षाची विकासकामे पाहता दिवसेंदिवस पक्षप्रवेश करणार्यांची संख्या वाढत आहे. त्याअंतर्गत शेकापचे पालेखुर्द येथील युवा नेते राकेश दुर्गे, निकेश दुर्गे, जयेश दुर्गे, प्रविण सुर्वे, सुराज माळी, चंद्रकांत वावरे यांनी शनिवारी जाहीर पक्षप्रवेश केला. पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी प्रवेशकर्त्यांचे पक्षाची शाल देऊन पक्षात स्वागत केले.